नाकाबंदीत अवैध जनावरांची वाहतूक करणारे दोन बोलेरो जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलिसांनी पोलीस स्टेशन समोर नाकाबंदी लावून केलेल्या तपासणीत दोन बोलेरो वाहनातून आठ जनावरांची वाहतूक होत असल्याने दोन्ही वाहन ताब्यात घेऊन कार्यवाही केली. तिरोडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ व १४ मार्चचे रात्री तिरोडा पोलिसांना मिळालेले गुप्त माहितीनुसार दोन बोलेरो वाहनातून अवैध्यरित्या गोवंशजनावरांची वाहतूक होत अहल्याचे माहितीवरून तिरोडा पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक शुभम नष्टे यांचेसह पोलीस कर्मचाºयांनी पोलीस स्टेशन तिरोडा समोर लावलेले नाकाबंदी दरम्यान पहाटे २.१५ दरम्यान दोन पांढरे बोलेरो वाहने थांबवून तपासणी केली असता यातील एमएच २८ बीबी ७९३६ वाहनात तीन पांढºया रंगाचे बैल व एक काळ्या रंगाचा असे ४ बैल अंदाजे किंमत ८० हजार रुपये व वाहन ६ लक्ष लक्ष रुपये, तसेच दुसरे वाहन क्रमांक एमएच १२ एमव्ही ५४८२ या वाहनात दोन पांढºया रंगाचे एक काळसर निळ्या रंगाचा व एक लाल रंगाचा असे ४ बैल अंदाजे किंमत ८० हजार रुपये व वाहन अंदाजे ६ लक्ष रुपये असे एकूण दोन्ही वाहन व जनावरांची एकुण किंमत १३ लक्ष ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अनिकेत जयहरी मुळे (१९ वर्ष) रा. उदनापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा व कृष्णा भास्कर बळी (वय २४) रा. साखरखेडा, ता. सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा या दोन्ही आरोपींवर फौजदारी प्रकरण प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० कलम ११(१)(ड)(ई) सहकलम महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम १९७६ चे ५,६,९ नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक शुभम नष्टे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *