
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा खैरलांजी मार्गावर दुचाकी समोर आल्याने दुचाकी घसरून समोरून येणारे बसचे आत गेल्याने अपघात पाहणाºयांची जीवाचे ठोके चुकले मात्र बस चालकाने प्रसंगा सावधान राखून बस उभी केल्याने कुठलीही अघटीत घटना न होता दुचाकी स्वार किरकोळ जखमी होऊन थोडक्यात बचावले असून दुचाकीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. आज दिनांक २० रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान तिरोडा खैरलांजी मार्गावरील गिरजाबाई कन्या शाळेकडे जाणारी वळणावर तिरोडा येथील रहिवासी आशिष हेमराज भादरे वीस वर्ष रामेश्वर कटरी २७ वर्ष ही दुचाकीने दुचाकी क्रमांक एम एच ३५ ए यू ०४६४ ने जात असता अचानक दुचाकी समोर डुक्कर आल्याने दुचाकीची जबरदस्त धडक लागून दुरवर काही अंतरावर जाऊन पडून मरण पावले तर दुचाकी घसरून जवळपास दीडशे फूट घसरत जात असता समोरून तिरोडा आगाराची तिरोडा मलाजखंड सकाळी ४.४५ वाजता निघालेली बस क्रमांक एम एच ४० वाय ५४१३ चे चालक ओम प्रकाश कावळे यांना दुचाकी घसरल्याचे दिसल्यावरून त्यांनी बस जागीच थांबवल्याने तसेच समोरून बस येत असल्याचे दुचाकी स्वरांना दिसल्यावरून त्यांनी दुचाकीवरून उड्या मारल्या परंतु दुचाकी स्वार बस खाली येण्यापासून बचावले असले तरी दुचाकी मात्र घसरत बस चे समोरुन आतमध्ये गेल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांचे हृदयाचे ठोके चुकले मात्र सुदैवाने दुचाकी स्वारांना किरकोळ मार लागल्याने उपस्थित नागरिकांनी त्वरित दोघांनाही उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरता दाखल केल्याने दुपारी दोन्ही जखमींना उपचारा करून घरी पाठवण्यात आले असून एसटी बसचे कुठलेही नुकसान झाले नसून बसचे चालक ओम प्रकाश कावळे व वाहक प्रशांत तिडके हे ही सुरक्षित असून बस चालकांने सदर घटनेची माहिती तिरोडा पोलीस स्टेशन येथे दिली असली तरी कुठलाही गुन्हा दाखल झाला नसून सदर बस मलाजखंड येथे न जाता परत तिरोडा आगारात जमा करण्यात आली आहे.