तिरोडा नगरपरिषदेत उपाध्यक्षाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नगरपरिषद तिरोडाची आज दिनांक १६ रोजी नवनिर्वाचित सदस्य व नगराध्यक्षयाचे कार्यकाळाची पहिली सभा होत असून या सभेत उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार असून नुकत्याच नगरपरिषद तिरोडा येथे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसची युती असल्याने उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश गुनेरिया यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदांचे सार्वत्रिक निवडणुकीत तिरोडा नगर परिषदेत थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष अशोक असाटी व निर्वाचित २० नगर सेवकांची आज शुक्रवार दिनांक १६ रोजी पहिली सभा नगरपरिषद तिरोडाचे सभागृहात आयोजित करण्यात आली असून याच सभेत दोन स्वीकृत सदस्य व उपाध्यक्ष पदाची निवड होणार असून या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा सदस्य व भारतीय जनता पक्षाचे सहा सदस्य असून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाºयांकडून होत असलेले चचेर्नुसार आम्ही निवडणुकीत वेगवेगळे लढले असलो तरी राज्यात आमची युती कायम असल्याने तिरोडा नगर परिषदेतही आम्ही युतीतच राहो अशा चर्चा असल्याने उपाध्यक्षपदी तिरोडा नगर परिषदेचे सर्वात अनुभवी सहाव्यांदा सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले राजेश गुनेरिया यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *