पोलीस वर्धापन दिनानिमित्त तिरोडा पोलीस स्टेशनतर्फे वॉकथॉन व मिनी मॅरेथॉन चे आयोजन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन तिरोडा तर्फे वॉकथॉन व मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन तिरोडा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस स्टेशन तिरोडा तर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयकुमार रहांगडाले उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहिल झरकर नगराध्यक्ष अशोक असाटी यांचे प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजता ३ कि.मी.वॉकथॉन स्पधेर्ची सुरुवात पोलीस स्टेशन तिरोडा ,गजानन महाराज मंदिर, शिंगाडा तलाव, डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळा, दुर्गा मंदिर ,ठाकूर मोहल्ला, भूतनाथ वार्ड, गुरुदेव चौक ,मोहनलाल चौक, कन्या शाळा मार्गे पोलीस स्टेशन तर मिनी मॅरेथॉन ५ कि.मी. स्पर्धेची सुरुवात पोलीस स्टेशन, मोहनलाल चौक ,गुरुदेव चौक, सुकडी नाका, करिष्मा टी पॉईंट, चुरडी फाटा मार्गे परत चंद्रभागा नाका ,सचिन स्टोर, पोलीस स्टेशन या मार्गाने आयोजित केली आहे.

या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून या स्पर्धेचा कौतुक सोहळा सकाळी ८ वाजता पोलीस स्टेशन तिरोडा येथे आयोजित करण्यात आला असून या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता तिरोडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी अमित चचाने, अख्तर शेख दिनेश कस्तुरे, विजय हिरापूरे, कैलास ठाकरे, धनंजय बारई यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तिरोडा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *