चवताळलेल्या रानडुकराचा धुमाकूळ; एकाच दिवशी सहा जणांना केले जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातील सोनोली, धादरी, उमरी व लोधीटोला परिसरात चवताळलेल्या रानडुकराने गुरुवारी (दि. १३) धुमाकूळ घातला. एकाच दिवशी रानडुकराने बापलेकासह सहा जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. यामध्ये तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या चौघांना तिरोडा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले, तर दोघांवर तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनोली येथील कमलाबाई महेश मोहरे (३५) या सकाळी साडेनऊच्या सुमारास सासºयासह शेतात काम करीत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास धादरी येथील शेतकरी येसूदयाल शिवजी पटले (५०) हे शेतात काम करीत असताना त्यांच्यावरही रानडुकरानेहल्ला केला. यानंतर लोधीटोला येथील बळीराम गॅलिग्राम मोहरे (६८) व त्यांचा मुलगा सुनील बळीराम मोहरे (४०) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. बळीराम मोहरे किरकोळ जखमी झाले असून सुनील यांच्या पोटावर तसेच हातापायांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. तसेच जाधव येथील फुलंबाई दुर्योधन (५९) व उर्मिला कृष्णकुमार पाटील यांनाही रानडुकराच्या हल्ल्यात दुखापत झाली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *