
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुजारी टोला येथे दिनांक ३१ मे २०२६ रोजी एक अज्ञात वेडसर यूवती मिळून आली असता. तिला तातडीने केटीएस रुग्णालय गोंदिया येथील वन स्टॉप सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. सदर युतीचे पालकांचा तांत्रिक विश्लेषण व सखोल चौकशी अंती सदर युवतीची ओळख पटली असता सदर यूवति पूजा अरविंद गुजर (वय २९ वर्ष, रा. नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर) असे समजले व सदर यूवती बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्टेशन रामटेक येथे असल्याचे माहिती वरून तिरोडा पोलिसांनी तिचे वडिलांची संपर्क साधला. दिनांक ५ जून रोजी सदर युवतीचे वडील अशोक रामकिशन थोपटे ५८ रा. नगरधन, ता. रामटेक हे पो.स्टे. तिरोडा येथे हजर झाले असता संपुर्ण खात्री करून सदर युवतीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.