
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरातून राष्ट्रीय महामार्ग ७५३ जात असून सुकडी नाका ते विरसी पर्यंत रस्त्यावर अपघात मोठ्या प्रमाणात वाढले असून अनेकानी प्राण गमावले आहे. याची दखल घेत आमदार विजयकुमार रहांगडाले यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली. यामध्ये प्रामुख्याने अदानी पॉवर ली,येथे मोठ्या प्रमाणात कोळशाचे व राखेचे दररोज ४०० पेक्षा जास्त टिप्परच्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे निदर्शान आले असून याकरिता अदानी प्रकल्प ते विर्सी फाट्यापर्यंत वेग नियत्रक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले.
अदानी गेट क्र.३ च्या समोर वाहतूक कर्मचारी ठेवणे,ट्रिपल सिटधारकांवर कडक कार्यवाही करणे, १८ वर्षाखालील वाहन चालकांवर कार्यवाही करणे, हेलमेटची सक्ती करणे, टिप्परला सुरक्षा गार्ड आवश्यक करणे,रॅश ड्रायव्हीगवर नियंत्रण ठेवणे, लायसन्सची सक्ती करणे याकरिता परिवहन विभाग व पोलीस विभागाने विशेष लक्ष पुरवून नियमांची अमलबजावणी करण्याचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिले या बैठकीत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, उप्विभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, दवणीवाडा पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, गंगाझरी पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा तहसीलदार नारायण ठाकरे, सा.बा.उपविभागीय अभियंता संजय रुद्रकार, न.प.अध्यक्ष अशोक असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरीया, न.प.सदस्य संजय बैस, न.प.मुख्याधिकारी अमोल म्हाळकर, अदानी तर्फे विमुल पटेल, कश्यप उपस्थित होते.