तिरोडा पोलीस व महसूल विभागाचे कार्यवाहित जेसीबी व ट्रॅक्टर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध्य उत्खनन व वाहतूक होत असल्याने तहसीलदार तिरोडा यांनी अवैध्य रेती उत्खनन व वाहतूक होण्याकरिता नेमलेले पथकापैकी एका पथकाने रेती भरून जाणारा ट्रॅक्टर तिरोडा पोलिसांनी रेती उत्खननाकरिता जाणारा जेसीबी जप्त केल्याने अवध्य रेती उत्पन्न वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

तिरोडा तालुक्यातील अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेले तिरोडा पथकाचे मंडळ अधिकारी ए एम. शहारे, तलाठी एस.एम. डोंगरे गस्तीवर असताना तिरोडा तहसील कार्यालयाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारे मार्गावर सकाळी ६ वाजता दरम्यान रेती भरलेले ट्रॅक्टर दिसल्यावरून ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालकास त्याचे नाव गाव व रेती वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली असता चालकाने आपले नाव प्रवीण शंकर बिसेन रा.कवलेवाडा सांगितले व आपल्याकडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्यावरून सदर ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३५ जी ५८४७ ताब्यात घेऊन तहसील कार्यालय तिरोडा येथे केले.

पाच तारखेचे पहाटे दोन वाजता चे दरम्यान तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे, हवालदार दीपक खांडेकर, शिपाई महेंद्र अंबादे, जाधव चालक कोरे गस्तीवर असताना मिळालेले माहितीवरून घाटकोरडा रेतीघाताकडे जात असलेले एक पिवळ्या रंगाचे जेसीबी पकडून पोलीस स्टेशन तिरोडा येथे आणून फिर्यादी महेंद्र अंबानी याची तक्रारीवरून जेसीबी चालक नवनीत विजय कापसे रा. खमारी याचे विरोधात भागतीय न्याय संहिता कलम ६२, ३०५ नुसार गुन्हा नोंद केला.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय कवडे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *