३५ ब्रास रेती चोरी प्रकरणी दोन टिपर व एक जेसीबी जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील धादरी बेलाटी मार्गावर सुरू असलेले रस्त्याचे बांधकामा करिता ठेवलेल्या रेती पैकी काही रेती साठा दोन टिप्पर मध्ये एका जेसीबीच्या सहाय्याने भरून चोरी केल्याची तक्रार तिरोडा पोलीसात नोंदविण्यात आली होती. तिरोडा पोलीस स्टेशन येथे दोन टिप्पर मालक व जेसीबी मालका विरोधात गुन्हा दाखल करून तिरोडा पोलिसांनी कार्यवाही केली आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहितीनुसार धादरी बेलाटी रस्त्याचे काम गोंदिया येथील एस एम वालिया अँड ब्रदर्स तर्फे सुरू असून याकरता बांधकाम कंपनीतर्फे एका शेतात रेतीचा साठा करून ठेवला होता.

या साठ्यापैकी पाच तारखेचे रात्री दोन टीप्पर मध्ये जेसीबी चे सहाय्याने रेती भरून ३५ ब्रास रेती चोरुन नेल्याची तक्रार बांधकाम कंपनीचे सुपरवायझर नैनलाल बुदराम रीनायत यांनी तिरोडा पोलीस स्टेशनला दिली. तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) ३( ५) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला असता सदरची रेती टिपर क्रमांक एम. एच. २९ बी इ ३३९१ व एम. एच. ३६ इ ३५६५ मध्ये जेसीबी क्रमांक २३ ६० ने भरुण ३५ ब्रास रेती किंमत १ लक्ष ५ हजार रुपये चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. सदर टिप्पर अमित रामदास भोंगाडे रा.सरांडी व अंकुश संतोष बावनकर रा.खोपडा तर जेसीबी चेतन टेंभरे रा.तिरोडा यांची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरोधात तिरोडा पोलिसांनी कार्यवाही करून दोन्ही टिप्पर व जेसीबी जप्त करून कार्यवाही केली पुढील तपास उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *