ट्रेलरच्या भीषण अपघातात तरूण जागीच ठार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोंदिया ते तुमसर मार्गावरील माडगी वैनगंगा नदीपुलाजवळ अपघाताची खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात वैनगंगा नदी पुलावर असलेल्या टरबूज विक्रेत्याच्या दुकानात भरधाव ट्रेलर शिरलाय. या भीषण अपघातात टरबूज खरेदी करणारा तरुण अक्षरश: चिरडला गेलाय. हा अपघात इतका भीषण होता कि यात तरुणाचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना तुमसर – गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील माडगी इथं घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. मात्र भीषण अपघातात निष्पाप तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश ओके (३०) असं मृतं तरुणाचं नावं आहे. मृतक हा मध्यप्रदेशातील बालाघाट येथील असून तो माडगी इथं टरबूज खरेदीसाठी थांबला होता. यावेळी कोळसाचा वाहतूक करणाºया ट्रेलर अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या टरबूजच्या दुकानात शिरल्यानं ही घटना घडली. या अपघातात टरबूज विजेत्याचं हजारो रूपयांचं नुकसान झालय. तर दुसरीकडे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *