
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनकर्मचाºयांवर बिबट्याने हल्ला केल्याने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, याही परिस्थितीत वनकर्मचाºयांनी धैर्य दाखवत बिबट्याला जेरबंद केले. लाखनी वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रामपुरी अंतर्गत मौजा दिघोरी- नान्होरी येथील गावलगत शेत शिवारात वन्यप्राणी बिबट असल्याची माहिती वन कर्मचाºयांना मिळाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी हे आपल्या अधिनस्त वनरक्षक व वनकर्मचाºयांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांच्या जमावास वन्यप्राणी संघषार्पासून हानी होवु नये, याकरीता योग्य सुचना देण्यात आले. तसेच सदर बचाव कायार्बाबतची माहिती उपवनसंरक्षक, भंडारा व सहाय्यक वनसंरक्षक साकोली व पोलीस निरीक्षक, लाखनी यांना देण्यात आली. त्यानंतर बिबट याच्या बचावकार्य करण्याकरीता वन्यप्राणी बचाव दल भंडारा या चमुस घटनास्थळी पाचारण करण्यात आले असता त्यांनी घटनास्थळाची पहाणी करुन वन्यप्राणी बिबट याने मानव अधिवास क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे मानव वन्यप्राणी संघर्ष घटना होण्याची शक्यता टाळण्यासाठी बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्याचे निर्णय घेतले.
पशुवैद्यकीय अधिकारी कनेरी, विठ्ठल हटवार यांनी बिबट वन्यप्राण्यास जेरबंद करण्याचे औषध तयार केलेनंतर फफळ टीमचे शुटर अनिल शेळके यांनी बिबटास डार्ट मारून बेशुद्ध केले व वन्यप्राणी बिबटास यशस्वी जेरबंद करण्याची कार्यवाही करण्यात आली. पशु वैद्यकीय अधिकारी कनेरी, विठ्ठल हटवार यांनी जेरबंद करण्यात आलेला बिबट हा शारीरीक दृष्ट्या सृदृढ असल्याचे अहवाल दिल्याने सदर बिबटास त्याच्या निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
भंडारा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांचे मार्गदर्शनाखाली संजय मेंढे, सहाय्यक वनसंरक्षक साकोली, सचिन निलख, सहाय्यक वनसंरक्षक भंडारा, श्री. बारसे, पोलीस निरीक्षक लाखनी, नितेश धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी, लाखनी, शुभम मोदनकर जिवशास्त्रज्ञ, वनपाल लाखनी, जितेंद्र बघेले, वनरक्षक अजय उपाध्ये, तुकाराम डावखोरे, बालाजी कदम, वाहन चालक अनिल शेळके व आरआरटी टीमचे सदस्य शशांक तुरस्कर, निशी वानखेडे, अविनाश नागपुरे, नरेंद्र उर्कुडकर यांनी बचाव कार्यात महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच पोलीस विभाग लाखनी येथील पोलीस कर्मचारी व लाखनी वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक व वनकर्मचारी तसेच गावकरी सरपंच, पोलीस पाटील यांच्या मदतीने सदर बिबट बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. वन्यप्राणी संघर्षाची घटना उद्भवल्यास त्याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती विभागीय कार्यालयाचे सनियंत्रण कक्ष ०७१८४ -२५२२८३ या वर संपर्क साधावा किंवा तात्काळ नजीकच्या वनाधिकाºयास द्यावी, जेणेकरून मानव हानी च्या घटना टळू शकतील, असे आवाहन भंडारा वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.