केंद्र सरकारच्या ‘चार लेबर कोड्स’ चा विरोध!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रीय फेडरेशन इंटकच्या आवाहनावरून आणि रक्षा विभागातील फेडरेशन आय.एन. डी. डब्ल्यू. एफ. यांच्या मार्गदर्शनानुसार आयुध निर्माणी भंडारा येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘न्यू एक्सप्लोसिव फॅक्टरी वर्कर्स युनियन, भंडारा’ तर्फे दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक पातळीवर नव्या कामगार कायद्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी सरकार- विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारत सरकारने संसदेत चार लेबर कोड्स मंजूर करून ते १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्याची घोषणा केली आहे. सध्या लागू असलेले २९ कामगार कायदे रद्द करून ते या चार लेबर कोड्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर इंटक फेडरेशनच्या नेतृत्वाखाली १० केंद्रीय कामगार संघटनांनी एकत्र येत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी एकदिवसीय संपाचे आवाहन केले होते.

या चार लेबर कोड्समुळे कामगारांना सध्या मिळणाºया युनियन व कर्मचाºयांच्या हक्कांमध्ये कपात होणार आहे. विशेषत: नव्या युनियनच्या नोंदणीस नकार दिला जाणार आहे. कर्मचाºयांच्या संपाच्या अधिकारावर कठोर निर्बंध येणारआहेत. औद्योगिक क्षेत्रात कर्मचाºयांच्या कामाच्या तासांत वाढ होणार आहे. ३०० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये ट्रेड युनियन स्थापन करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत तसेच औद्योगिक व्यवस्थापन प्रशासनाच्या अधिकारावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या चार लेबर कोड्सचा देशभरातील सर्व केंद्रीय ट्रेड युनियनांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र तरिसुध्दा भारत सरकारने ते १ एप्रिल २०२६ पासून हे कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशव्यापी संपाला एकजूट दर्शवण्यासाठी आणि कामगार ऐक्य प्रदर्शित करण्यासाठी देशातील सर्व कामगार संघटना तसेच रक्षा विभागांमध्ये केंद्र सरकारविरोधात हि निदर्शने करण्यात आली. ‘नवे कामगार कायदे मागे घ्या’, ‘निगमीकरण रद्द करा’ आणि ‘जुनी पेन्शन योजना लागू करा’ अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते.

या आंदोलनाचे स्थानिक स्तरावर नेतृत्व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य चंद्रशील नागदेवे, युनियनचे कार्यका- री अध्यक्ष जयदेव बारई, कार्यसमिती सदस्य विकास बावनकुळे, मोहम्मद शहनवाज, कुलदीप खोबरागडे, कैलास टेकाम, योगेश कावले, प्रशांत चकोले, आशीष बोरकर, अनिल पात्रे, शिवदास शेंडे, विजय वलथरे, शंकर कावले, ए. जी. चौधरी, अजहर सय्यद, कमलेश साठवने, विजय बेठे, प्रवीण महानकर, एकनाथ कुंजेवर, अमोल दोडके, कुंदन चौरे, अभिलाष तिवारी, संघरक्षित गजभीये यांनी केले. त्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *