
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच, राजमाता जिजाऊ फाउंडेशन व महिला दलित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ फाउंडेशन व महिला दलित सेना अध्यक्षा सुनिता सुरज परदेशी तर प्रमुख अतिथी म्हणुन सूर्यकांत ईलमे, विष्णूदास लोणारे. विलास सुदामे, अजय वासनिक,राहुल थोटे, सचिन मेश्राम,सुरज निबाते , गजु मेहर राजकुमार दहेकर,मुन्ना मतलानी, वैष्णवी परदेशी, रूद्रीका परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारो शिव भक्त व नागरीकांना साबुदाना खिचड़ी व कंद वाटप करण्यात आले. यावेळी संपुर्ण वातावरण शिवभक्तीमय झाले होते.
