कोयलारी ग्रा.पं.येथील सरपंच, उपसरपंचासह चार सदस्यांचे पद रद्द

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येणा?्या कोयलारी ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांना कर थकबाकी प्रकरणात अपात्र ठरविण्यात आले आहे. विभागीय आयुक्त, नागपूर यांनी दिलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायतीत मोठी खळबळ उडाली असून आता येथे प्रशासक नेमण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १४ (१) (ह) नुसार, ग्रामपंचायतीचा कोणताही सदस्य किंवा पदाधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे देय कर निश्चित मुदतीत न भरल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. कोयलारी ग्रामपंचायतीतील काही पदाधिकाºयांनी घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती व स्वच्छता कराची थकबाकी ठेवली होती.

ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये त्यांना वारंवार कर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लेखी नोटीस देऊन ३० दिवसांची मुदतहीदेण्यात आली होती. मात्र संबंधितांनी मुदतीत कर न भरल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मनराज ठाकरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. गोंदियाच्या जिल्हाधिकाºयांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि ग्रामपंचायतीचे अभिलेख तपासून सुरुवातीला संबंधित सदस्य अपात्र नसल्याचा निर्णय दिला. हा आदेश चुकीचा असल्याचे सांगत ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले. अपीलाची सविस्तर सुनावणी झाल्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चौरे यांनी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड, कर वसुली नोंदी आणि सुनावणीतील मते विचारात घेत अंतिम निर्णय दिला. त्यानुसार सरपंच रणजित वाल्दे, उपसरपंच दिवान हिरामण कटरे तसेच सदस्य विनोद नरबद परतेती, दुर्योधन दयाराम रहांगडाले, ममता आनंदराव हटवार आणि नंदा सुखदेव मदनकर यांना पदावर राहण्यासाठी अपात्र ठरविण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *