
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : सालई खुर्द तिरोडा मार्गाचे बार्बरीक कंपनीतर्फे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून काही महत्त्वाचे जागेवर बसवण्यात आलेले पथदिव्यापैकी तिरोडा शहराचे तिरोडा ते गोंदिया मार्गावर असलेले पथदिवे रात्री उशिरा सुरू होऊन दिवसा बराच वेळ सुरू राहत असल्याने वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागत असून विजेचाही गैरवापर होत असल्याने कंपनीतर्फे पथदिवे वेळेवर सुरू व बंद होण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर सालई खुर्द ते तिरोडा अदानी प्रकल्पापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करून या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी अंदाजे तीन वर्षापूर्वी पथदिवेही बसवण्यात आले असून तिरोडा शहराचे सुकळी नाका ते अदानी विज प्रकल्पापर्यंत बसवण्यात आलेले पथदिवे अनेकदा सतत बंद राहून तर कधी रात्री ८ ते ८.३० दरम्यान सुरू होउन दिवसा ९ ते १० वाजेपर्यंत सुरूच राहत असल्याने या मार्गावरून संध्याकाळी अंधारामुळे ये जा करणारे वाहन चालकांना व पायी जाणाºयांना तसेच महिलां मुलींना भीतीचे वातावरणात ये जा करावी लागत असून अंधारामुळे अपघात होऊन जीवीत वा वित्तहानी होण्याची शक्यता असून हे पथदिवे रात्री उशिरा सुरू होऊन दिवसा उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने उगाच विजेचाही गैरवापर होत असल्याने बार्बरीक कंपनीतर्फे याकडे लक्ष देऊन पथदिवेयोग्य वेळी सुरू होऊन बंद करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.