तिरोडाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटी यांच्या अध्यक्षतेखाली १६ जानेवारी ला होणार पहिली सभा

रमाकांत खोब्रागडे / भंडारा पत्रिका तिरोडा : तिरोडा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सभा १६ जानेवारी रोजी होणार असून याच सभेत दोन स्वीकृत सदस्यांची व उपाध्यक्षाची निवड होणार असून स्वीकृत सदस्य लोकाभिमुख असावे अशी अपेक्षा तिरोडाकर बाळगून असून स्वीकृत सदस्यांकरता भारतीय जनता पक्षाकडून पाच नावे तर राष्ट्रवादी पक्षाकडून चार नावांची चर्चा सुरू आहे.

तिरोडा नगर परिषदेचे मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत निवडून आलेले नवनियुक्त नगराध्यक्ष अशोक असाटी यांचे अध्यक्षतेत पहिली सभा शुक्रवार दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी बारा तीस वाजता होणार असून याच सभेत स्वीकृत सदस्यांची व उपाध्यक्षाची निवड होणार असून स्वीकृत सदस्यांकरता सामाजिक, शैक्षणिक, सहकार, वैद्यकीय, अभियांत्रिकी , प्रशासकीय क्षेत्राचा अनुभव असलेले व्यक्ती पात्र ठरत असून तिरोडा शहरातील नागरिकांचा स्वीकृत सदस्य हा तिरोडा शहरातील नागरीकांच्या मूलभूत समस्यांची जान असणारा अभ्यासू व लोकाभिमुख असावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. तिरोडा नगर परिषदेत वीस सदस्य असून यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ सदस्य, भारतीय जनता पक्षाचे ६ सदस्य , उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे १ व काँग्रेस पक्षाचे १ सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ सदस्यांचा एक गट भारतीय जनता पक्षाचा एक गट उबाठा व काँग्रेस पक्षाचा एक गट असे तीन गट असले तरी संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे एक व भारतीय जनता पक्षाचे एक असे दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

याकरिता भारतीय जनता पक्षाकडून स्वानंद पारधी, अनुप बोपचे, उमाकांत हारोडे, बाबा भैरम, राजेश मलघाटे या नावांची चर्चा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजय सिंह गौर ,डॉक्टर अविनाश जैयस्वाल, नरेश कुंभारे, सलीम भाई जवेरी या नावांची चर्चा असून स्वीकृत सदस्य निवडीकरिता होणारे सभेचे २४ तास आधी इच्छुक व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जाची छाननी होऊन ज्या गटाकरिता जितके सदस्यांनी अर्ज केले आहेत त्या सदस्यांचे वैद्य ठरलेले नावे त्या पक्षाचे गटनेत्याला कळवून एकापेक्षा जास्त नावे असल्यास गटनेता आपले स्वीकृत सदस्यांचे नाव सभेचे पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांना लिखित कळवतील ज्यावरून पिठासीन अधिकारी सदर नाव स्वीकृत सदस्य म्हणून जाहीर करतील अशी माहिती मिळाली असून या पहिल्या सभेकरिता तिरोडा नगरपरिषदेचे इमारतीची रंगरंगोटी व सभागृहाचे नूतनीकरणाचे काम जोरात सुरू असून स्वीकृत सदस्यपदी आपलेच नाव जाहीर व्हावे म्हणून इच्छुक व्यक्ती आपापले पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधत असून स्वीकृत सदस्यांबद्दल नागरिकातही उत्सुकता असून या सभेत नंतरच दोन्ही गटांचे स्वीकृत सदस्यांची लॉटरी कुणाला लागेल हे उघड होणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *