अधिकाºयांची पाहणी… तुमसर बसस्थानकाच्या व्यवस्थापनाला दाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : ‘हिंदू हृदय सम्राट अभियान’ अंतर्गत चतुर्थ सर्वेक्षणाच्या निमित्ताने राज्य परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी तुमसर बसस्थानकाची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानकातील सुविधा, स्वच्छता, वाहतूक नियोजन आणि प्रवाशांना दिल्या जाणाºया सेवांचा बारकाईने आढावा घेण्यात आला. या सर्वेक्षणात विभाग नियंत्रक सचिन डफळे (अमरावती), सहाय्यक अभियंता प्रविण अंबुलकर (अमरावती), प्राचार्य राहूल डोंगरे आणि किशोर बोंद्रे यांनी संपूर्ण बसस्थानकाची तपशीलवार पाहणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक कन्हैया भोगे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक रचना मस्करे, वाहतूक निरीक्षक सागर मलघाटे, चार्जमेन आकाश बांगळकर यांच्यासह वाहतूक नियंत्रक गजानन मोटघरे, लतिश नारनवरे, निशिकांत मोटघरे, सीमा मेश्राम यांनी व्यवस्थापनाची धुरा समर्थपणे सांभाळली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *