तुमसर नगरपरिषदेत पदोन्नतीचा खेळखंडोबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तुमसर नगरपरिषदेतील वरिष्ठ लिपिक पदाच्या पदोन्नती प्रक्रियेत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला असून, आस्थापना विभागाच्या मनमानी कारभारामुळे पात्र कर्मचाºयांवर अन्याय होत असल्याचा खळबळजनक आरोप लिपिक रितेश माणिकरावभाजीपाले यांनी केला आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हा सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा, भंडारा यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. रितेश भाजीपाले यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार, तुमसर नगरपरिषदेने २७ जुलै २०२५ रोजी वरिष्ठ लिपिक पदोन्नतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. या प्रस्तावात सुरुवातीला काही कर्मचारी एसीबी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने व शैक्षणिक पात्रतेअभावी अपात्र ठरले होते. २९ डिसेंबर २०२५ च्या विभागीय पदोन्नती समितीच्या  इतिवृत्तानुसार, खेमराज सेलुकर आणि रितेश भाजीपाले हे दोनच कर्मचारी नियमानुसार ‘पात्र’ ठरले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *