साकोलीत आॅनलाईन लॉटरी सट्टयाचा कहर; तरुणाई व्यसनाच्या विळख्यात!

नाजीम पाशाभाई/भंडारा पत्रिका साकोली : तालुक्यात आॅनलाईन लॉटरी सट्ट्याचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले असून यामुळे ग्रामीण परिसरातील व शहरातील तरुणाई आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे भविष्य अक्षरश: अंधारात जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. एकोडी रोड, बाजारपेठ व प्रमुख वर्दळीच्या भागांमध्ये खुलेआम सुरू असलेल्या या अवैध सट्टा केंद्रांमुळे युवकांमध्ये जलद पैसा कमावण्याची धोकादायक मानसिकता वाढीस लागली आहे. मोबाईलच्या माध्यमातून ‘लिंक घ्या आणि पैसे कमवा’ या आमिषाने अनेक तरुणांना जाळ्यात ओढले जात असून, चहा टपºया, पानटपºया आणि गर्दीच्या ठिकाणी फिरते एजंट सक्रिय असल्याचे स्पष्ट दिसून येते. या सट्टा व्यवसायाचा विस्तार इतका वाढला आहे की, काही ठिकाणी दिवसभर युवकांची गर्दी दिसून येते,ज्यामुळे सामाजिक वातावरणही बिघडत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *