
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सुकळी येथील युवक त्याच्या मोटरसायकलने अतिवेगाने तिरोडाकडे जात असतांना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोटर सायकल स्लिप होवुन झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. इंदिरा टोली सुकळी येथील रहिवासी ३० वर्षीय युवक राकेश विजय शेंडे हा आपले मोटर सायकल क्रमांक एम एच ३५ ए क्यू ५८५० ने सुकळी येथून तिरोडाकडे जात असतात मेंढा गावाजवळ भर वेगात असलेली मोटार सायकल स्लिप झाल्याने युवक ाच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच हवालदार निळकंठ रक्षे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवलिे. प्रकाश अरुण शेंडे याचे फिर्यादी वरून तिरोडा पोलिसांनी सदर युवक आपली मोटार सायकल हय गईने चालवून आपले मृत्यूस कारणीभूत झाल्याचे तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) सहकलम मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे करीत आहेत .