तब्बल आठ दिवसानंतर नरभक्षक बिबट्यास पकडण्यात वन विभागास आले यश

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : जवळपास मागील दोन महिन्यापासून नरभक्षक बिबट पकडण्याकरिता तिरोडा वन विभागासह नवेगाव व भंडारा येथील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी बिबट्यास जेरबंद करण्याकरता धडपडत होते. मात्र हा चपळ बिबट वन विभागातर्फे लावलेले पिंजºयात न अडकता मुक्त संचार करत असता ९ जानेवारी रोजी खडकी येथील एका ३ वर्षीय बालकास आई समोर उचलून नेल्याने नागरिकांमध्ये वन विभागाचे विरोधात तीव्र असंतोष पसरल्याने वन विभागातर्फे अनेक प्रयत्न करूनही बिबट सापळ्यात न अडकता वन विभागाचे अधिकाºयांना जेरीस आणले होते ज्यावरून वन विभागातर्फे अनेक प्रकारे या बिबट्यास जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत असता हा प्रयत्न अखेर १७ जानेवारीच्या रात्री सफल होऊन या नरभक्षक बिबट्यास बेशुद्ध करून पकडण्यात येऊन गोरेवाडा येथील पशु बचाव केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.

तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील नववर्षीय बालिका आपले वडिलांसह २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी चार वाजता चे दरम्यान शेतात असताना अचानक एका बिबट्याने तिचेवर हल्ला करून ओढत घेऊन गेल्याने सदर बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या परिसरात वन विभागाचे विरोधात मोठा आक्रोश निर्माण झाल्याने वन विभागातर्फे या बिबट्यास पकडण्याकरता चार जागी पिंजरे लावले होते, मात्र हा बिबट या पिंजºयात न अडकता मुक्तपणे वावर करीत असतानाच ९ जानेवारी २०२६ रोजी खडकी येथील ३ वर्षीय बालक हिमांशू शिवशंकर रहांगडाले यास सकाळी ७.३० वाजता दरम्यान आई समोर उचलून नेल्याने सदर बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांचा वन विभागाचे कर्मचारी अधिकाºयांच्या विरोधात संताप व्यक्त होत होते.

दरम्यान वन विभागातर्फे या नरभक्षक बिबट्याला पकडण्याकरता या क्षेत्रात आणखी काही पिंजरे लावून, झोपड्या उभारुन तसेच काही जागी सीसीटीव्ही कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे व ड्रोन कॅमेरे वापरून तिरोडा, नवेगाव, भंडारा येथील वन विभागाचे ५० अधिकारी कर्मचारी ट्रॅक्युलायझर गण सह गस्त करून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत होते, तरी त्यांना यश येत नव्हते म्हणून वन विभागातर्फे उभारलेल्या एका झोपडीसमोर मोकळ्या जागेत तीन जागी बकरी बांधून ठेवल्याने दि. १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता चे दरम्यान या बिबट्याने यापैकी एका बकºयाला ठार केल्याने हा बिबट परत आपली शिकार खाण्याकरता येण्याची खात्री असल्याने ट्रॅक्यूलायझर गणसह वन इधिकारी व कर्मचारी दबा धरून बसले असता १७ तारखेच्या संध्याकाळी ७.३० वाजता हा नरभक्षकबिबट सकाळी मारलेला बकरा खाण्याकरता आला असता त्यास ट्रकूलायझर गणणे बेशुद्ध करून पकडण्यात येऊन वन विभाग कार्यालय तिरोडा येथे आणल्या वरून या बेशुद्ध बिबट्यास पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर काही वेळाने या जेरबंद केलेल्या बिबट्यास गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव केंद्रात पाठवण्यात आले असून या बिबट्यास जेरबंद केल्याने संपूर्ण तिरोडा तालुक्यात नागरिकांमध्ये पसरलेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *