आसोला ते आथली मार्गावर बिबट्याचा रुबाब

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात, विशेषत: लाखांदूर, तुमसर आणि इतर ग्रामीण भागांत बिबट्यांचे दर्शन आणि दहशतीची अनेक प्रकरणे दिवसागणिक समोर येत आहेत. ज्यात सीसीटीव्ही फुटेज, पाऊलखुणा आणि कधी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन होत आहे. काल रात्रीच्या सुमारास आसोला ते आथली या मुख्य मार्गावर बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एका चारचाकी वाहनधारकाने हा थरार आपल्या कॅमेºयात कैद केला असून, बिबट्या निर्धास्तपणे रस्ता ओलांडतानाचा हा व्हिडिओ चांगलाच प्रसारित होत आहे. भंडारा जिल्ह्यात बिबट्या दिसणे ही एक सामान्य घटना बनली आहे.

विशेषत: नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि आसपासच्या जंगलव्याप्त भागांमुळे जिथे अलीकडेच दुर्मिळ काळा बिबट्याचे सुद्धा दर्शन होत आहे. बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकदा वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघषार्मुळे बिबट्या मानवी वस्तीत शिरल्याच्या घटनाघडतात. जंगलात आढळणारा बिबट्या आता मानवी वस्तीकडे आगेकूच करू लागले आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये खैरीपट गावात बिबट्याच्या दहशतीमुळे वनविभागाने तळ ठोकला होता. डिसेंबर २०२५ मध्ये लाखांदूर येथे शिकारीच्या शोधात जंगलातून गावात आलेल्या बिबट्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता, ज्यात बिबट्या कोंबड्यांवर झडप मारत असल्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *