परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तिरोडा न.प. मुख्याधिकाºयांची अतिक्रमणावर धडक कार्यवाही

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरात मोठ्या प्रमाणात काही दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर सिमेंटचे ओटे व शेड तयार केल्याने रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने तिरोडा नगर परिषदेत परिविक्षाधीन जिल्हाधिकारी साई किरण नंदाला यांची मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांनी हे अतिक्रमण काढण्याचा चंग बांधून अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून तीन दिवसात स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते.

मात्र अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानात समोर येईल अतिक्रमणे न काढल्याने आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळ पासूनच स्वत: अतिक्रमण काढणारे दस्त्यासह मुख्याधिकारी साईकिरण नंदाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी स्नेहल रामटेके व नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचेसह जेसीबी व ट्रॅक्टर सह खैरलांजी मार्ग व चंद्रभागा मार्गावरील जवळपास ५५ ते ६० अतिक्रमणधारकांवर कार्यवाही करून त्यांनी आपले दुकानासमोर सिमेंट ओट्याचे बांधकाम व शेड तोडण्याची कारवाई केली. यावेळी काही साहित्य जप्त करून कार्यवाही करून तर काही दुकानदारांनी स्वत: आपली अतिक्रमणे तोडल्याने तसेच काही अतिक्रमण धारकाकडून ५५ हजार ६०० रुपये दंड वसूल करून कार्यवाही केल्याने तिरोडा शहरात असलेले अतिक्रमणधारकांवर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी यांचे या धडक कारवाईमुळे धडकी भरली असून इतर भागातील अतिक्रमणधारक कारवाई पासून वाचण्याकरिता स्वत:च अतिक्रमण काढण्याची शक्यता आहे ?

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *