पुलावरून युवकाची उडी घेऊन आत्महत्या

हत्या की आत्महत्या याबाबत संशय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- जवाह रनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शहापूर-नांदोरा मार्गावरील पुलावरून एका युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतकाचे नाव रुपेश विजय सोनवणे वय ३६ (रा. शहापूर) असे आहे. सदर पुलावर गोसे धरणाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात असल्याने युवकाचे शव शोधण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. घटनास्थळावरून रुपेशचे चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र ही घटना आत्महत्या की हत्या, याबाबत परिसरात चर्चांना उधाण आले असून, जवाहरनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *