
यशवंत थोटे/ भंडारा पत्रिका मोहाडी : आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने बहुउद्देशिय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने दु:खी गरीब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवनजगण्यास प्रेरीत करुन,वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे मानव धमार्चे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेने सामुहिक हवन कार्य मोहाडी मंडळातर्फे कांद्रीच्या वतीने मंगळवार दि.१० फेब्रुवारी २०२६ ला करण्यात आले. बहुउद्देशिय प.पू.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत कांद्री येथील सर्व सेवकांच्या व ग्रा.पं. कांद्री यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दि.९ फेब्रुवारी २०२६ ला सकाळी १० वाजता महान त्यागी बाबा जुमदेवजी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.मंगळवार दि.१० फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ९ वाजता सामुहिक हवन कार्य भगवान पिलारे,सुनिल आकरे,सुभाष कुंभलकर, गौरी मानकर,दिलिप नान्हे यांनी केले.
सकाळी १० ते १२.३० वाजता शोभायात्रा. दुपारी १२.३० ते १ वाजता दीप प्रज्वलन करण्यात आले. दुपारी १ ते १.३० वाजता स्वागत समारंभ झाले.दुपारी १.३० वाजता चर्चासत्र व मार्गदर्शन झाले. सायंकाळी ४.३० वाजेपासून स्नेहभोजनाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे उद्घघाटक आध्यात्मिक प्रमुख मानव धर्मप्रचार व प्रसारीका अध्यक्ष लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते तर बांधकाम व शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. सत्कारमूर्ती म्हणून ब.उ.प.पू.प.एक सेवक मंडळ मोहाडीचे जेष्ठ मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष यशवंतराव ढबाले गुरुजी,जेष्ठ मार्गदर्शक तथा कार्याध्यक्ष रघुनाथ पिलारे यांची विशेष उपस्थिती होती.सरपंच बैजू बंसोड, डॉ.शुक्ला, प्रमेश नलगोपुलवार,शँकर सोनटक्के, धर्मराज बावणकुळे चाचेर,अशोक जांगडे पालोरा,मोरेश्वर सार्वे, यशवंतराव ढबाले गुरुजी,नरेश ईस्वरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

पं.स.सदस्य उमेश भोंगाडे,पोलीस पाटील प्रकाश तुपट,ग्रामपंचायत सदस्य दिनेश बालपांडे,आशिष टेकाम, बेबीनंदा गलबले,सारिका भिवनकर,किरण बालपांडे,निर्मला खडसे,अविनाश सोनवाने,तुळजा यशवंतराव ढबाले,मंडळाचे उपाध्यक्ष देवचंद सेलोकर,सचिव युवराज गलबले, कोषाध्यक्ष राकेश लिल्हारे, सहसचिव रोहित शेंडे,संचालक रामनरेश बोंदरे,सहादेव लुटे,अशोक बोंदरे,हितेश ढोबळे,विजय निमकर, शालू प्रकाश निंबार्ते,व्यवस्थापक भगवान पिलारे,संगणक चालक लक्ष्मण माहुले,विजय दमाहे,सरस्वता माटे, जयपाल पटले,विलास चौधरी,दिनेश देशमुख,वसंता धामणे, प्रकाश निंबार्ते,इंद्रपाल मते,बाबू भागरकड,मोरेश्वर भिवगडे,मधुकर वैद्य,कवडू दीपटे,विलास बुद्धे,बंडू बावणे,राजीव भोयर,रवी शेंडे,मधुकर पटले,जानराव भरे,स्वप्नील बडवाईक,विनोद तांडेकर,योगेश ठाकरे,गुरु शेंडे,राजू माटे,एकनाथ जीभकाटे, रविकुमार मरसकोल्हे,विजय सरोदे, सुधीर चिमूरकर,पुरुषोत्तम बावनकर, मोहन राऊत,जागेश्वर बोंदरे,नीलकंठ आथीलकर, दामोदर नेवारे,मुक्ता धुर्वे, मदन कनोजे,भगवान पडोळे, आकाश डोये,उमेश मोहतुरे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. प्रारंभी हनुमान,बाबा जुमदेव,आई वाराणशी यांच्या छायाचित्राला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.स्वागत नृत्य कु. शिवानी दिलीप बुरडे,कु.प्रियंका सतीश हजारे,कु.संध्या सुरेश तुपट, कु.अंजली अमित बालपांडे,कु.प्राची राधेश्याम गिरीपुंजे,कु.आरुषी प्रविण गलबले,कु.हर्षदा पुरुषोत्तम नान्हे, कु.प्रतिज्ञा आशिष हजारे,कु.रितू आगाशे यांनी वेषभूषेत प्रस्तुत केले.
यावेळी झाकी प्रथम बक्षिस राजु पिलारे कांद्री यांच्याकडून ११००१ रुपये नितेश कुलरकर डोंगरगाव. द्वितीय नारायण बालपांडे पेट्रोलपंप यांच्याकडून ९००१ रुपये संजय पंचबुद्धे मांढळ.तृतीय सुभाष शिवरकर कांद्री यांच्याकडून ६००१ रुपये अरुण बोदरे सुकळी.चतुर्थ अनिल आकरे कांद्री यांच्याकडून ४००१ रुपए रामेश्वर बोदरे देव्हाडा.पाचवे गौरीशंकर मानकर कांद्री यांच्याकडून ३००१ रुपये राजेंद्र आंधळे हिवरा. सहावे मनोहर गलबले कांद्री यांच्याकडून २००१ रुपये संजय नागपूरे खूटसावरी.सातवे सुभाष भिवगडे कांद्री यांच्याकडून प्रोत्साहन बक्षिस १००१ रुपये गुड्डू बालपांडे कांद्री,राधेश्याम गिरेपुंजे,लेझीम पथक निशा क्षीरसागर,आदित्य निमकर, लेझीम अनिल आकरे यांना देण्यात आले.भारतीय सैन्य दलात निवडी बद्दल राहुल सुनिल आकरे,सौरभ बाबूराव सेलोकर,सौरभ सजीपाल खोब्रागडे वासेरा,हर्षल बेनिराम भरे वाडा यांना ट्राफि देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावर अतिथीचे स्वागत उपाध्यक्ष नामदेव निमकर,कोषाध्यक्ष दयाराम देशमुख,सचिव युवराज गलबले,सहसचिव पुरुषोत्त नान्हे, कार्य.सदस्य सुनिल आकरे,सुभाष कुंभलकर,घनश्याम निमकर,प्रभु फटींग,भगवान पिलारे,सत्यफुला डोनारकर,विजय निमकर,संगिता पिलारे, बंडु शिवरकर यांनी केले. प्रास्ताविक व्यवस्थापक भगवान पिलारे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन उमेश भोंगाडे यांनी केले तर आभार सचिव युवराज गलबले यांनी केले. रात्री ८ वाजता नंदू धांडे यांचे कलापथक कार्यक्रम सुरू झाले.