
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत अॅग्रीस्टॅक संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी ही रबी हंगाम २०२६ साठी शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तातडीने शेतकºयांनी नोंदणी करण्याचे आवाहन लाखानीच्या तहसीलदार शितल घावटे यांनी केले आहे. रब्बी हंगामाकरिता पीक नोंदणीला सुरुवात झाली शेतकरी स्तरावरील अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ आहे. ई- पीक पाहणी केल्यास शेतकºयांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. पीक विमा योजनेचा लाभ, पीक कर्ज मिळविणे सुलभ होते, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळते, तसेच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) अंतर्गत पिकांची अधिकृत नोंद होते.
यासोबतच अॅग्रीस्टॅक अंतर्गत राबविण्यात येणाºया सर्व कृषी योजना आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ शेतकºयांना मिळतो. या सर्वांचा लाभ मिळावा याकरिता सर्व शेतकºयांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी ठरलेल्या मुदतीत पूर्ण करावी. शेतकरी स्वत:च्या मोबाईलद्वारे डीसीएस अॅपच्या माध्यमातून पीक नोंद करू शकतात. यानंतर सहायक स्तरावरील पीक पाहणीचा कालावधी २५ जानेवारी ते १० मार्च २०२६ असा राहणार आहे. कृषी शासकीय लाभासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य आहे. वेळेत पीक नोंदणी केल्यास भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे तत्काळ पीक पाहणी पर्ण करून आपले हक्काचे शासकीय लाभ सुनिश्चित करावे. असे आवाहन तहसिलदार लाखनी शितल घावटे यांनी केले आहे.