
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: परिसरासह लाखनी तालुक्यातील मºहेगाव रेती घाट वगळता ईतर सर्व घाट बंद असतानाही बंदीच्या काळात रेती तस्करीला सुगीचे दिवस आले असल्याचे वास्तव दिसून येत आहे. पोलीस व महसूलच्या अभयातून रेती तस्करांचे धाडस वाढल्याने आता भर दिवसाही लाखनीसह पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतून मुरमाडी(तूप.) परिसराच्या ग्रामीण भागातून शहरी भागाकडे रेतीचे टिप्पर विना रॉयल्टी विना पास सर्रास धावत आहेत. कारवाईसाठी महसूलकडून कानाडोळा केल्या जात असल्याने दुसरीकडे मात्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
काही महिन्यापूर्वी रेती घाटांच्या लिलावानंतर दरम्यानच्या काळात लिलावीत रेती घाटांवरून रेती सुरु झाली. सामान्यांना अल्प दारात रेती देण्याचा आदेश धडकताच घाट मालकांनी नवीन युक्तीचा वापर करीत घाटातील चांगली रेती अधिकतम पैसे देणाºयाच्या पदरी पाडली तर जाड रोडाचा माल रॉयल्टीच्या माध्यमातून रेती घेणाºया सर्वसामान्यांच्या मस्तकी मारला. दुसरीकडे याच मºहेगावातून रेती तस्करी करणाºया तस्करांनी विना लीलावित लाखांदूर तालुक्यातील तावशी,साखरा, दिघोरी ह्या घाटातील सिमांकनातून अहोरात्र बेसुमार उपसा करणे सूरू केले आहे. लाखनी तालुक्यातील लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेल्या मºहेगाव घाटाचे सिमांकन वगळता भूगाव, विहीरगाव,पळसगाव,नरव्हा, लोहारा, ढिवरखेडा इतर घाटांचाही अनधिकृतश्रीगणेशा याच तस्करांनी केला.काही महिन्यांपूर्वी परिसरातील घाट बंद झाले.मात्र या बंदीच्या काळातही महसूल व पोलिसांच्या आशीवार्दाने मुजोर झालेले रेती तस्कर आवरेनासे झाले आहेत. याकरिता तहसील प्रश- ासनाने नवीन पथक नेमुन मुख्य चौकात व आडवाटेच्या ठिकाणी कारवायांमध्ये वाढ करावी व प्रशासनाचा महसुल वाचवावा अशी मागणी परिसरातील पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाकडे केली आहे.