भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
दिघोरी मोठी : तालुक्यातील कन्हाळगाव येथील शंकर केशव बेदरे (वय २५) या तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरालजवरील तुकूम परिसरात रेल्वेने कट्टून मृत्यू झाल्याची घटना रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या दुर्देवी घटनेने कन्हाळगाव परिसरात शोककळ्ळा पसरली आहे. देसाईगंज-गोंदिया रेल्वेमार्गावरील तुकूम परिसरात सकाळीच्या सुमारास रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह दोन तुकडे पडलेल्या अवस्थेत आढळून आला. नागरिकांनी पाहणी केल्यानंतर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थल्ये धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. प्रारंभी मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. मात्र, नंतर तो लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील शंकर केशव बेदरे असल्याचे स्पष्ट झाले.