कत्लीसाठी जाणाऱ्या ४५ गोवंशांची सुटका

३९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

पवनी : कत्लीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची निर्दयेने वाहतूक करणाऱ्या टाटा एलपी ट्रॅकवर पवनी पोलिसांनी पाहुणे किल्त्याजवळ धाड टाकली. या कारवाईत ४५ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, जनावरे आणि ट्रॅक असा एकूण ३९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सय्यद वहाब सय्यद मोहम्मद अली (२८, रा. पठाणपुरा, जुनी बस्ती, मूर्तिजापूर) आणि वाहनाचा क्लीनर सय्यद जाबीद सय्यद जाबीर (२६, रा. सिरसो, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाहनात पुरेशी जागा नसतानाही ४५ जनावरांना दाटीवाटीने बांधून, चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच आवश्यक वाहतूक परवाना नसताना कत्लीसाठी घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी कारवाई करून ९ लाख ८० हजार रुपये किमतीची गोवंश जनावरे आणि ३० लाख रुपये किमतीचा टाटा एलपी ट्रॅक असा एकूण ३९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस शिपाई संघर्ष बोरकर यांच्या लेखी तक्रारीवरून पवनी पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच मोटर वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार प्रवीण डगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन वानखेडे पुढील तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *