लाखनी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ‘बोगस खत प्रकरण’ चौकशी थंडबस्त्यात

■ शेतकऱ्यांना फसवणारे उत्पादक, पुरवठादार आणि सचिव, सभापती आणि संचालक मंडळ मोकाट ■ शेतकऱ्यांत असंतोष, पोलीस विभाग संशयाच्या भूमिकेत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

लाखनी :- बहुचर्चित लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित कृषी चिकित्सालयवर १२९.२५ मे टन बोगस खत आढळल्याप्रकरणी पोलीस स्टेशन लाखनी येथे विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली असली तरीही गेल्या १ वर्षापासून पोलिसांची तपास चक्रे अत्यंत मंद गतीने सुरु असल्याचे सांगत असले तरीही चौकशी सुरु आहे की बंद है मात्र कळू शकले नाही, त्यामुळे या बोगस खत विक्री प्रकरणाचा शोध केव्हा लागणार? वाकडें शेतकऱ्यांचे लचून आहे, या प्रकरणात येथील सचिव संजय पारोडे यांना अटक झाली असली तरीही ते जामिनावर मोकाट आहेत, भावनगर (गुजरात) चे कौशिक डी पांड्या वय ५५ वर्ष डीसोगनेटेड पार्टनर मेसर्स फार्मंडिल इंडिया एलएचएलपी, आणि राजेश पो तर्राडे वय ४५ वर्ष प्रोप्रायटर मेसर्स क्रिसोललाइट प्रीयांश अॅग्रो नागपूर (महाराष्ट्र) यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

तसेच या प्रकरणात बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ हेही तेवढेच दोषी असताना त्याच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आरोपी मोकाट फिरत असल्याने या बोगस खत विक्री प्रकरणाच्या तपासावर शेतकरी-बांधवांचे उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर मोठा महलिंदा खाणारे मात्र मोकाट फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कार्यवाही केव्हा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कैवारी असलेले सरकार किंवा संचालक मंडळावर अटकेची कार्यवाही करेल काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून येथील सचिव संजय पारोडे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने ते मूळचे नाशिक जिल्ह्याचे रहिवासी असल्याने हा शेतकऱ्यांची फसवणूक गेलेला पैसा कोण भरून देणार? हाही प्रश्न निर्माण झाला आहे.

संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही ना? याचा शोध घेणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गरजेचे झाले आहे. याप्रकरणी संचालक मंडळाने अटक पूर्व जमीन मिळवला होता. मात्र या प्रकरणांची चौकशी झाली नाही. त्यामुळे राजकीय दबावाने प्रकरण बंद तर केले नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणी पोलिसांनी शिरोमरी घेवून हे प्रकरण दडपले नाही ना? असे नानाविध प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण होत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ना. जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष दिल्यास दोषीवर कठोर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकेच सत्य आहे

बाजार समिती उठली शेतकऱ्यांच्या जीवावर

शेतकऱ्यांच्या हिताची समजणारी कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना लुबाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असल्याचे चित्र आहे, बाजार समितीच्या कार्यभार विश्वास ठेवून परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकविलेल्या धान्याची येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केली. मात्र अपुऱ्या नियोजनाने बाजार समितीत ठेवलेले धान कुजते, सडते तर काही उगवले त्यामुळे खरेदी फरतेवेळी शेतकऱ्याकडून ओलाच्या म्हणून ३ किलो प्रति क्विंटल घेतले जाते आणि शासनाकडून टूट म्हणून निधीची उचल केली जाती. त्यामुळे शेवटी शासनाची आणि शेतकऱ्यांची चोरी करून बाजार समिती कार्यभार चालवत असल्याने या प्रकरणी दोषी अधिकारी व संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *