
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी:- येथील मंडळ अधिकारी देशमुख यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्यामुळे त्यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे. एकीकडे शासन जनतेच्या तक्रारी जागेवर सुटाव्या यासाठी निधी खर्च करून समाधान शिबीर आयोजित करीत आहे. तर दुसरीकडे येथील मंडळ अधिकारी शासनाच्या चांगल्या योजनेला मूठमाती घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार गुंथारा येथील प्रणय विजय सार्वे यांचे लाखनी येथे गट क्रमांक ५८९/२/२४ मध्ये भूखंड असून त्याची किंमत ३५३३११ रुपये आहे. त्यांना धान खरेदी केंद्रासाठी सदर प्लॉट जिल्हा पणन अधिकारी भंडारा यांच्याकडे गहाण करून दिल्याचे संबंधाने लाखनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उरकुडकर यांनी त्यांचे पत्र क्रमांक प्रस्तुत/१/२७६ दिनांक ३०/४/२६ नुसार लाखनी मंडळ अधिकारी यांना तात्काळ सदरचा बोजा दर्जा करून या कार्यालयास कळविण्यासंबंधीचे पत्र दिले मात्र मंडळ अधिकारी यांनी हेतू परस्पर भूखंड धारकाकडून आर्थिक गोळी खाण्यासाठी त्या पत्राला केरातीटोपली दाखवली असल्याने शासनाच्या कामाला शासनाचे अधिकारी डोळे झाक करत असतील तर जनतेने जावे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा बेजबाबदार अधिकाºयावर तातडीने जिल्हाधिकारी यांनी गंभीर प्रकरणाची दखल घेऊन त्यांच्यावर कार- वाही करावी अशी मागणी केल्या जात आहे.
यापूर्वी या मंडळ अधिकाºयाने करडी परिसरात असाच मोठा धुमाकूळ घातल्याने तेथील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. परंतुत्यांचे सासरे यांचा राजकीय वजन वापरून करडीवरून त्यांची लाखनी येथे स्थानांतरण करण्यात आले होते मात्र इथेही सदर मंडळ अधिकाºयाने तीच भूमिका मानली असल्याने अशा या आर्थिक गोळी खाणाºया मंडळ अधिकाºयास शासनाने त्वरित पावले उचलून एक तर त्यांना निलंबित करावे. किंवा त्यांचा नागरिकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबध येणार नाही. अश्या ठिकाणी नियुक्ती करावी. या मंडळ अधिकाºयाचा लाखनी तालुक्यातील पूर्व प्रताप पाहता माननीय महसूल मंत्री यांनी याची दखल घ्यावी अशी ही मागणी केल्या जात आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे