तुमसर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी सिहोरा : पंचायत समिती तुमसर अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मधील सरपंच व सदस्य पदाच्या रिक्त जागेसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यात निवडणुकीची रणधुमाळी धडाक्यात सुरू झाली आहे. निधन, राजीनामा, कलम ३९/१ नुसार अपात्र, जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे, कलम १४(१)(जे) नुसार अपात्र व कलम ४० (१) नुसार अपात्र व इतर कारणामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने घेण्यात येत आहे. तुमसर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत पैकी २० ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्यांच्या एकूण २० जागा रिक्त आहेत व या २० रिक्त जागेसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

यात ग्राम पंचायत मुरली(सि), बपेरा(आं), बपेरा (सि), गोंदेखारी व वाहानी या ५ ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक होईल. सुकळी (दे), हरदोली (सि) व गोंदेखारी येथे प्रत्येकी २ सदस्य या पदासाठी निवडणूक होणार असून सिहोरा, गोबरवाही, मिटेवाणी, मांगली(दे), माडगी, परसवाडा(सि) देवाडी, रोंघा व खैरंंलांजी या ग्रामपंचायत मध्ये प्रत्येकी एक सदस्य या पदासाठी निवडणूक होत आहे. नाम निर्देशनपत्र दाखल झाल्यानंतर १५ एप्रिल ही नामनिर्देशन पत्राची छाननी करणे ही अंतिम तारीख असेल १७ एप्रिल ही उमेदवारी अर्ज परत घेण्याची व त्याच दिवशी दु.३ च्या नंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन निवडणूक चिन्ह वाटप करणे व २८ एप्रिल स.७.३० ते सा.५.३० मतदान करण्याची वेळ असेल. तुमसर तालुक्यात २८ एप्रिल रोजी होत असलेल्या ५ सरपंच व १५ सदस्य पदाच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू असून राजकीय पक्षाचे पुढारी होणाºया निवडणुकीवर पाळत ठेवून आहेत. काही गावात ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध करण्याच्या तयारीत असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे. सध्या चर्चेत असलेल्या ग्रामपंचायत वाहानी व बपेरा (सि) येथील सरपंच पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *