
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी आरोपी निलंबित सचिव अनिल भोयर यास विविध मागण्यासह अभय देणारे पत्र आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस भंडारा जिल्हा कौन्सिल यांच्याकडून बाजार समितीला देण्यात आले आहे. या पत्राचे संदर्भीय घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती भाऊराव तुमसरे नी सदर धान्य मंडीत मधील कर्मचारी असलेली पीडित महिलेस आयटी क ने दिलेल्या पत्रातून पीडित महिला कर्मचारी हिला मानसिक त्रास होत आहे.
त्या सदर पत्रामधील सहीकर्यत्यांवर कडक कायदेशीर कार- वाई करून फौजदारी दाखल करण्यात येईल. असे लेखी तक्रारीच्या माध्यमातून सभापती भाऊराव तुमसरे यांनी प्रसिद्ध केली आहे. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती विनयभंग प्रकरण पासून बदनामीस आली आहे, अख्या राज्यात समिती ची उत्तम छबी आहे परंतु विनयभंग प्रकरणापासून बाजार समिती बदनामीला कारणीभूत ठरली आहे त्यामुळे विनयभंग प्रकरणी आरोपी सचिवअनिल भोयर यांच्यावर समितीने निलंबनाची कारवाई केली आहे.
आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस भंडारा जिल्हा कौन्सिल यांनी बाजार समितीला दिलेल्या लेखीपत्रात विविध मागण्याचे पत्र दिले आहे. त्यामध्ये प्रमुख मागणीत पीडित महिला कर्मचारी हिला बाजार समितीमध्ये लेखपाल म्हणून कार्यरत आहेत, तिला या पदावरून पदमुक्त करण्याची मागणी केलेली आहे. आॅल इंडिया ट्रेड युनियन ही महिलांच्या होणाºया अत्याचाराला व अन्यायावर वाचा फोडणारी संस्था असून बाजार समितीला दिलेल्या पत्रामध्ये त्यांनी एका अन्याय झालेल्या महिले वर ताशेरे उडवले आहे व तिला दोषी ठरवून तिच्या निलंबनाची मागणी केलेली आहे. कौन्सिल्स ने दिलेल्या पत्राचे प्रत्युत्तर देत बाजार समितीतील सभापती भाऊराव तुमसरे यांनी अन्याय झालेल्या पीडित महिला कर्मचारी हिच्या निलंबन करण्यावर आवाज उठवला आहे. यावरून असे स्पष्ट होते की, सदर संघटना यातील आरोपीला संरक्षण व पाठीशी घालत असून एका महिलेवर आरोप करत आहेत, हे निंदनीय बाब आहे. नेहमी सदर महिलेच्या बाजूने असलेली संघटना आज एका विनयभंग प्रकरणात यातील आरोपीला संरक्षण देण्यात येत आहे, ही सदर बाब अशोभनीय दिसत आहे. त्यावरून पीडित महिला कर्मचारी ताण तणावात व मानसिक त्रास कॉन्सिलच्या पत्राने होत आहे, त्यावर सही करणारे सर्व सदस्यांना गुन्हे दाखल करून व कारवाई करण्यात यावे, असे लेखी पत्राचे द्वारे सभापती भाऊराव तुमसरे यांनी पोलीस अधिकारी यांना दिले आहे.