पवनी तालुक्यातील रेती घाटांमधून शासनाला रॉयल्टीच्या खेळातून लाखोंचा चुना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- भंडारा जिल्हयातील रेती घाटांचे लिलाव अडचणीत आले असतांना अधिकाºयांच्या आशिर्वादरूपी आदेशाने जवळपास २० ते २२ घाटांमधून रेती उत्खननास व विक्रीस परवानगी घाटधारकांना मिळाली. घाटधारकांनी महसुल अधिकाºयांना हाताशी धरून मिळालेल्या संधीचा फायदा घेत शासनाची प्रचंड मोठी लुट त्या माध्यमातून करीत असल्याचा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी जिल्हाधिकारी यांनादिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. पवनी तालुक्यातील गुडेगाव, खातखेडा, जुनोना, शिवनाळा व अन्य घाटांमधून पोकलेन मशीनद्वारे दिवसरात्र रेतीचा उपसा करून दररोज सुमारे २०० ते ३०० मोठे टिप्पर भरल्या जात आहेत.

हे बहुतेक टिप्पर एकतर बिना रॉयल्टी ने किंवा नाममात्र २ ते ३ ब्रासच्या रॉयल्टीमागे १० ते १२ ब्रास रेती टिप्परमध्ये भरून विक्रीसाठी रवाना केल्या जात आहेत. रॉयल्टी कमी ब्रासची आणि रेती ओव्हरलोड भरलेल्या टिप्परांना मग रस्त्यामध्ये कोणत्याही अधिकाºयांनी अडवू नये, कार्यवाही न होण्यासाठी घाटधारक टिप्परमालकाकडून “सुपर एन्ट्रीच्या” नावावर प्रति टिप्पर १ लक्ष १५ हजार रुपए घेवून संबंधित विभागाच्या अधिकाºयांना मॅनेज करण्याचे काम करीत असल्यामुळे अश्या टिप्परांवर कोणत्याही विभागाकडून कार्यवाही होतांना दिसत नसले तरी या माध्यमातून शासनाचा रोजचा लाखो रूपयाचा महसुल बुडत असला तरी अधिकारी आणि घाटधारक मात्र मालामाल होत आहेत. जिल्हयात कधी महसुल विभागाकडून तर कधी पोलीस विभागाकडून नाममात्र दोन चार ट्रॅक्टर वर कार्यवाही करून आम्ही कर्तव्याशी प्रामाणिक असल्याचे सोंग दाखविले जाते. त्यामुळे अशा कमी ब्रासचीरॉयल्टी असलेल्या टिप्परमधुन ओव्हरलोड रेतीच्या वाहतुकीवर संबंधित महसुल, उपप्रादेशिक कार्यालय, खनिकर्म, पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे तालुकाप्रमुख तिलक सार्वे, उपतालुकाप्रमुख राजेश नान्हे,प्रशांत देशमुख,विभाग प्रमुख आकाश बांते, गौरव सावरकर, दुर्गेश नान्हे ,सोमेश्वर सेलोकर इत्यादी पदाधिकाºयांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *