
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सामान्य रुग्णालय, भंडारा येथे रुग्णांना पुरविण्यात येणाºया जेवणाच्या दजार्बाबत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. प्रशांत पडोळे यांनी अचानक भेट देत भोजन कक्ष व स्वयंपाकगृहाची पाहणी केली असता अनेक त्रुटी समोर आल्या. पाहणीदरम्यान भोजन कक्षात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व दुगंर्धी आढळून आली. रुग्णांना दिले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे व काही ठिकाणी कच्चे असल्याचे दिसून आले. स्वयंपाकगृहातील भांडी व परिसराची स्वच्छता समाधानकारक नसल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत असल्याचे आढळले. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून शासन नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. या प्रकारामुळे रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ होत असल्याची गंभीर दखल घेत डॉ. पडोळे यांनी अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराची बिले थांबवावीत तसेच कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.