
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : नगर पंचायत लाखांदूर येथील सभागृहात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विषय समितीच्या सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. याप्रसंगी बांधकाम समिती सभापती पदी सौ. सोफिया अंजुम रिजवानखां पठाण यांची निवड करण्यात आली तर स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतीपदी सौ. विद्या व्यंकट गराडे , महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. वेणु राहुल कोटरंगे तर उपसभापती पदी सौ. प्रिया ज्ञानेश धाक- डे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती म्हणून उपाध्यक्ष प्रल्हाद मोतिराम देशमुख यांची निवड करण्यात आली.
या विशेष सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगर परिषद साकोली-सेंदुरवाफा चे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांची उपस्थिती होती. नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी साजेश मेश्राम तसेच इतर अधिकारी व कर्मचाºयांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी नगरपंचायत अध्यक्ष विनोद शंकरराव ठाकरे व सर्व सदस्यगण उपस्थित होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कोणताही वाद न होता शांततेत पूर्ण झाल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. आशिष घोडे यांनी दिली.