
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर: पोलीस ठाणे हद्दीतील हद्दीच्या लाखनी तालुक्यातून पुढे प्रवाहित होणाºया चूलबंद नदी पात्रातील रेतीची बेसुमारपणे होणारी वाहतूक नविन मºहेगाव,गोंदी, ढिवरखेडा मार्गे पालांदूर परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून रेती वाहतूक करणाºया एकाही ट्रॅक्टर व ट्रॉल्यांना नंबर नाहीत.सर्वट्रॅक्टरांसह ट्रॉल्यांचे नंबर खोडून टाकले असून, या कामी महसूलसह पोलिस यंत्रणाही अर्थपूर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याने या दोन्हीही विभागाचे नेमके चालले आहे तरी काय? असा प्रश्न नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.
पालांदूर येथील पोलीस ठाणे जवळून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर लाखांदूर तालुक्याची हद्द असून, लगतच चुलबंद नदीचे पात्र असल्याने या पात्रातील पाथरी येथून घरकूल बांधकामाकरीता लाखनी तहसील प्रशासनाने रेतीचा उपसा करण्याकरीता परवानगी दिली असली तरी या घाटातून उपसा करून वाहतूक करण्यात येत असलेल्या ट्रॅक्टरांसह चालक व मालकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांना डावलून मनमजीर्ने रेतीची वाहतूक करण्यात येतअसल्याचे चित्र दिसून येत आहे. घरकूल लाभार्थ्यांकरिता मोफत ५ ब्रास मिळालेल्या रेतीचा उपसा व वाहतुकीचा गैरफायदा घेऊन रेती तस्करांनी रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली असल्याचे चित्र आहे. रेतीच्या एकदाच काढलेल्या पासवर ४ ते ५ फेºया मारत असल्याचा प्रकार सर्रास सुरूच असल्याचे दिसून येत आहे.हा सर्व प्रकार प्रशासनाच्या डोळ्यादेखत व सर्व विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीनेच केला जात आहे हे विशेष.