बेवारस कुत्र्यांचा साकोली शहरात हैदोस

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : शहरात तसेच जवळील जांभळी सडक गावात बेवारस कुत्र्यांनी अक्षरश: हैदोस घालत दोन दिवसांत तब्बल १५ नागरिकांना चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. २३ व २४ फेब्रुवारी रोजी वर्दळीच्या ठिकाणी, एकोळी रोड चौक परिसरात आणि विविध प्रभागांत हे हल्ले झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला.

मात्र या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक विशेषत: दहशतीखाली आहेत. जखमींमध्ये काजल डोंगरवार (२०), रविंद्र नंदेश्वर (५०), दुर्गेश चव्हाण (४५), होमराज भुरे (४०), आकाश तिवारी (३५), सुरेंद्र ईन्हारे (३७), नितीन दिवाकर (३५), सरोज मेश्राम (४०), मंगलदास तिरपुडे (६१, जांभळी), सुनील रामटेके (५५, जांभळी), राहुल गोडेल (२६, जांभळी), नरेंद्र रामटेके (४२, जांभळी), मयूर भेंडारकर (२७, जांभळी) आणि अजय फुंडे (२२, मोहघाटा) सतीश भेंडारकर (४१ वर्ष कुंभली) यांचा समावेश आहे. काहींना किरकोळ तर काहींना गंभीर जखमा झाल्याची माहिती आहे.

गंभीर रीच्या जखमी आकाश तिवारी सुरेंद्र इनहारे नितीन दिवाकर व विश्वास भंडारकर हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरातील अनेक भागांत बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्बीजिकरण मोहीम किंवा कुत्रे पकडण्याची कारवाई याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित व संथ कार्यपद्धतीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून बेवारस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, लसीकरण व निर्बीजिकरण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा आणि शाळा व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांकडून जोर धरत आहे. अन्यथा आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *