बॅग लिफ्टींग व चेन स्नॅचिंग करणाºया आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या गजाआड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्हयातील पोलीस स्टेशन तुमसर, साकोली व लगतच्या जिल्हयांमध्ये विवीध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दोन ते तिन महिण्यात बॅग लिफ्टींग व चेन स्नॅचिंग करणाºया आरोपीतांनी गुन्हे केले असुन सदर संबंधाने भंडारा जिल्हयात व संबंधीत जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशन मध्ये याबाबत समआशयाचे गुन्हे नोंद करण्यात आले होते. वारंवार एकाच आशयाचे घडणाºया गुन्हयांची गार्भियता लक्षात नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, भंडारा, निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, भंडारा यांनी दिलेल्या निर्देशवजा सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार भंडारा जिल्हयात बॅग लिफ्टींग व चेन स्नॅचिंग या सदरात झालेल्या गुन्हयांचा अभ्यास करुन गुन्हे उकलकीस आण्याकरीता गुन्हयासंबंधाने पोलीस स्टेशन यांचे तपास पथकासह समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गर्शन केले. त्यानुसार प्रॉपर्टी सेल, स्था.गु. शा., भंडारा चे प्रभारी अधिकारी सोनवने व पोलीस स्टेशन, तुमसर येथील डिटेक्शन ब्रांच चे प्रभारी प्रविण सयाम यांचे दोन्ही पथकांनी गुन्हे उकलकीस आणण्याकरीता प्रयत्न सुरु केले.

भंडारा जिल्हयात तुमसर पालीस स्टेशन चे हद्दीत दिनांक १२/०१/२०२६ रोजी बँक आॅफ इंडीया शाखा, तुमसर येथुन व दिनांक २०/०२/२०२६ रोजी युनियन बँक, तुमसर चे परिसरात घडलेल्या बॅग लिफ्टींगचे घडलेल्या गुन्हयांचा तांत्रीक तपास करीत असतांना व पेरण्यात आलेल्या गोपनिय बातमिदारांकडुन माहिती मिळविण्याचा प्रयत्नात असतांना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी अशाच आशयाचा गुन्हा पोलीस स्टेशन साकोली येथे सुध्दा घडल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस स्टेशन तुमसर येथील एकुण ०२ व पोलीस स्टेशन साकोली येथील ०१ गुन्हयाचे तांत्रीक तपासात व प्राप्त फुटेजमधील इसमांची ओळख पठविण्याकरीता पथकाव्दारे करण्यात आलेल्या अथक प्रयत्नाअंती तपास पथक या निष्कर्षावर पोहचले की सदर तिन्ही गुन्हे करण्याची पध्दत व सिसीटीव्ही मध्ये दिसुन येणारे इसम हे ग्राम कडीया सांसी, बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश येथील आहेत. तांत्रीक तपास व प्राप्त गोपनिय माहितीचे आधारे वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा येथील प्रॉपर्टी सेल चे सपोनि. विवेक सोनवने, पोलीस अंमलदार चेतन पोटे, पोलीस स्टेशन तुमसर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि. प्रविण सयाम, पोलीस अंमलदार नामदेव बडदे, राजकुमार गिन्हेपुंजे असे पथक खाजगी चारचाकी वाहनाने गुन्हे उकलकीस आणनेकामी आरोपी शोधकरीता ग्राम कडीया सांसी, बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश खाना झाले व सातत्याने गुन्हयात लिप्त आरोपीतांबाबत माहिती प्राप्त करण्याकरीता ०४ दिवस परिसरात ठाण मांडुन होते.

तपास पथकास तुमसर व साकोली येथे घडलेल्या गुन्हयात लिप्त असलेल्या आरोपीतांचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त झाली. परंतु आरोपी वास्तव्यास असलेले ग्राम कडीया सांसी, बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश हे अतिसंवेदनशील असल्याने तेथे स्थानिक पोलीसांचे मदत घेतल्याशिवाय जाणे धोकादायक राहील अशी माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाने स्थानिक पोलीसांची मदत घेवुन धाडसी व अचुक नियोजन करून गुन्हयात अलिप्त आरोपी नामे अमन जितमल सिसोदिया, वय २४ वर्षे, रा. ग्राम कडीया सांसी, तह. बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश यांस ताब्यात घेतले व त्याचेकडुन भंडारा जिल्हयातील गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल व वापरण्यात आलेली मो. सा. ताब्यात घेवुन त्यास पो.स्टे. तुमसर येथे हजर केले.

चौकशी दरम्यान आरोपी अमन सिसोदिया याने तुमसर येथील ०२ व साकोली येथील ०१ गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच त्याचे इतर साथिदार व ऋषी अनुपसिंग सिसोदिया, वय २० वर्षे, रा. ग्राम कडीया सांसी, तह. बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश याचेसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व उत्तर प्रदेश या व इतर राज्यातील विवीध जिल्हयात गुन्हे यापुर्वी केल्याचे सांगितले आहे. आरोपी नामे अमन जितमल सिसोदिया, वय २४ वर्षे, रा. ग्राम कडीया सांसी, तह. बोडा, जि. राजगड, राज्य मध्य प्रदेश यांचे ताब्यातुन तिनही गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकुण १,४२,०००/- रुपये व एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल कि. ५०,०००/- असा एकुण १,९२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन तुमसर येथील प्रविण सयाम हे करीत आहेत. यात आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *