अखेर कोट्यवधींची वादग्रस्त निविदा रद्द… जाचक अटींवर ‘पूर्णविराम’

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : नगरपरिषदेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वादग्रस्त निविदेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे यांच्या ठाम हस्तक्षेपामुळे ही निविदा रद्द करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे. निविदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे स्थानिक कंत्राटदार स्पधेर्बाहेर जात असल्याची भावना तीव्र झाली होती.

या अटी बांधकाम सभापतींच्या मान्यतेने घालण्यात आल्याचे सांगितले जात असताना, त्या काही विशिष्ट कंत्राटदारांना अनुकूल ठराव्यात या उद्देशानेच आखण्यात आल्याची कुजबुज शहरात रंगली होती. अधिकृत पुष्टी नसली तरी या चर्चांमुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. दरम्यान, काही नगरसेवकांकडून आपल्या गटाशी संबंधित कंत्राटदारांना संधी मिळावी यासाठी हालचाली सुरू असल्याचीही चर्चा होती. सभागृहातील गदारोळ, बाहेर व्यक्त होणारी नाराजी आणि अखेर उच्च न्यायालयात पोहोचलेले प्रकरण, या सगळ्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली होती. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी थेट हस्तक्षेप करत निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. विकासकामे करताना पारदर्शकता आणि समान संधी या तत्त्वांशी तडजोड होणार नाही,असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

नव्या निविदेत जाचक अटी दूर करून सर्वांसाठी खुली, सुलभ आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्षांच्या या निर्णयामुळे स्थानिक कंत्राटदारांमध्ये दिलासा तर निर्माण झाला आहेच, पण नव्या प्रक्रियेबाबत अपेक्षाहीवाढल्या आहेत. आता नव्या निविदेत खºया अर्थाने समान संधी मिळते का, की पुन्हा ‘निवडक’च पुढे सरसावतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. एकंदरीत, वाढत्या वादाला आळा घालत प्रशासनात समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात असून, पुढील निविदा प्रक्रिया किती पारदर्शक ठरते हेच आता खरे कसोटीचे ठरणार आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *