
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हयातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हयात कार्यरत असलेल्या Bharat Petroleum corporatiom Limited (BPCL), Hindustan Petroleum corporatiom Limited (HPCL). Indian Oil corporatiom Limited (IOCL)या तीनही कंपन्यांचा भंडारा जिल्हयात पेट्रोल, डिझेल तसेच एल.पी.जी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असुन त्याचा नियमित व सुरळित पुरवठा करण्यात येईल, असे संबधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
परंतु भंडारा जिल्हयात मार्च २०२६ च्या सुरवातीला घरगुती गॅस सिलेंडरच्या (१४.२ ‘ॅ) दरात ६० रुपयांची वाढ झाली असुन आता तो रुपये ९७४.००/- प्रती सिलेंडर झालाआहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली असुन तो रुपये २०७३.००/- इतका झाला आहे. तसेच महिन्याला मिळणा-या घरगुती सिलेंडरची मर्यादा १५ दिवसावरुन २५ दिवस करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच आॅईल कंपनी जिल्हयातील गॅस सिलेंडरचा साठा, पेट्रोल व डिझेल साठा कायम राहील याबाबत कटीबध्द आहे. जिल्हयातील गॅस सिलेंडरचा, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपावर / गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवु नये. असे जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी कळविले आहे.