
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा/गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा शहरातील हॉटेल हेरिटेज च्या समोर अचानकपणे धावत्या ओमनी व्हॅनला आग लागली आगीने पाहताच रौद्ररूप घेत ओमनी व्हॅनला पूर्णपणे आगीत व्हॅन जळाली ही घटना आज ११ मार्च रोजी दुपारी घडली. याची माहिती तिरोडा अग्निशम विभागाला देण्यात आली. तातडीने अग्निशम दल घटना स्थळी दाखल झाली व लागलेल्या व्हॅन च्या आगी वर नियंत्रण मिळविले. मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र कार पूर्णत: जळून खाक झाली आहे. ओमनी व्हॅन ही गोंदियाकडून तिरोडाच्या दिशेने जात असताना हॉटेल हेरिटेज च्या समोर अचानक व्हॅनला आग लागली क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व यात ओमनी व्हॅन पूर्णता जळून खाक झाली..