अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तीन विद्यार्थी जखमी तिरोडा-गोंदिया मार्गावरील घटना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-गोंदिया मार्गावरील अदानी प्रकल्पासमोरील टाटा वर्कशॉपजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. तिन्ही विद्यार्थी घुमाधावडा येथील गणेश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे बारावीचे विद्यार्थी आहेत. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. बुधवारी (१९ आॅगस्ट) दुपारी ४ ते ४.३० वाजताच्या सुमारास ओम राजकुमार नेवारे, आदित्य महेंद्र नवानिया व जितेश चुन्नीलाल चौधरी हे तिघे विद्यार्थी दुचाकीने ट्रिपल सीट काचेवानीकडे जात होते. दरम्यान, समोरून येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात तिघेही विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने तिरोडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका विद्याथ्यार्ची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले आहे.दरम्यान, तिरोडा-गोंदिया मार्गावर अदानी प्रकल्पासाठी कोळसा वाहतूक करणाºया लांब ट्रकसह मोठ्या प्रमाणात मध्यम व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याच्या कडेला चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून, तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून अपघातांना आळा घालण्याची मागणी होत आहे. बातमी लिहीपर्यंत या घटनेची तिरोडा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *