पुतळ्याच्या संरक्षण भिंतीला चारचाकीची धडक; युवक ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सहकार नगर येथील रहिवासी युवकाचे चार चाकी वाहन २३ तारखेचे रात्री सुकळी नाका तिरोडा येथील पुतळ्याचे सुरक्षा भिंतीवर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. मूळ गुमाधावडा येथील रहिवासी सुरज पारधी हे सध्या आपले परिवारासह सहकार नगर तिरोडा येथे राहत असून २३ तारखेचे रात्री १२ वाजता दरम्यान त्यांचा मुलगा किरण सुरज पारधी ३४ वर्ष हा बिरसी कडून तिरोडाकडे आपले चार चाकी वाहन टाटा नेक्सान क्रमांक एम एच ३५ ए डब्ल्यू ७३२० ने येत असता त्याचे वाहन अनियंत्रित होऊन सुकळी नाका तिरोडा येथील महाराणा प्रताप यांचे पुतळ्याचे सुरक्षा भिंतीवर आदळून या युवकाचा जागीच मृत्यू झाला मात्र याच वेळी तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे, हवालदार नितेश बावणे, शिपाई धनंजय बारई, कैलास ठाकरे , चालक पोलीस शिपाई अख्तर शेख गस्तीवर असताना अपघाताची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी पोहोचून नागरीकांचे मदतीने रुग्णवाहिकेद्वारा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी यूवकास मृत घोषीत केले. पृथ्वीराज अनिल पारधी याचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तिरोडा येथे मृत युवकाने आपले वाहन हयगयीने चालवून आपले मृत्यूस कारणीभूत झाल्याचे तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) सहकलम मोटर वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा नोंद करून, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शव २४ रोजी दुपारी चंद्रभागा स्मशानभूमी तिरोडा येथे अंतिम संस्कार करण्यात आले असून पुढील तपास हवालदार नितेश बावणे करीत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *