
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : मागील सहा महिन्यापूर्वी तिरोडा शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री होत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र तिरोडा पोलिसांनी त्वरित कार्यवाही करून आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करून कत्तलखाना सील केला होता मात्र यातील आरोपींनी दुसरी कडून गोमांस आणून विक्री करण्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांनी तिरोडा पोलिसांना दिल्यावरून तिरोडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले.आरोपींना न्यायालयात हजर केले असता ७ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
३ मे रोजी तिरोडा शहरातील डॉक्टर झाकीर हुसेन वार्ड मध्ये गोमांस विक्री होत असल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांनी तिरोडा पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांना दिली.त्या आधारे पोलीसांनी त्वरित आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे, विजय मसराम ,विनायक दडस पाटील, उप पोलीस निरीक्षक शुभम नष्टे, हवालदार नितेश बावणे, पोलीस शिपाई शैलेश दमाहे, विक्की धांडे, शैलेश पटले यांचे सह आरोपी वकील अहमद मोहम्मद हुसेन कुरेशी यांचे घरी पाहणी केली असता त्यांचे घराचे मधल्या खोलीत गोमांस दिसून आल्याने ६० किलो गोमांस ,एक लोखंडी काता, पाच चाकू, एक इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा असे साहित्य जप्त जप्त केले.
आरोपी विरोधात पोलीस शिपाई शैलेश पटले यांचे फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम २७१,३२५ ,३ (५ ), सह कलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम ५ (सी)९(अ) नुसार गुन्हा नोंद करून आरोपी वकील अहमद मोहम्मद हुसेन कुरेशी ५५ वर्ष व सोहेल वकील मोहम्मद हुसेन कुरेशी वय ३० वर्ष या दोघांना अटक करून आज दिनांक ४ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस पाटील करीत असून गोमास विक्री होत असल्याचे माहिती मिळाल्यावर तिरोड्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.