केशोरीच्या पंढरीनगरात आगीचे तांडव

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी /कनेरी येथील पंढरीनगर येथे वास्तव्यात असलेल्या शिवदास शिवराम मडावी (७०) यांच्या घराला अचानक पणे लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना सोमवार (दि.०४) ला सकाळी दहा ते सव्वा दहा च्या सुमारास घडली आहे. घेतलेल्या संपूर्ण माहितीनुसार शिवदास शिवराम मडावी हे आपल्या सह पत्नीसह लग्न कार्याकरिता बाहेर गेले तर त्यांचा मुलगा हे दुसरा ठिकाणी लग्नकार्य करिता बाहेर गेले असता एक मुलगा नेहमीप्रमाणे सकाळीच आपल्या शेतमजुरीच्या कामाला गेले होते.

घराला आग कशी लागली हे कुणालाही न कळता जेव्हा घराच्या पाठीमागून घराच्या वर धूळ आले तेव्हा इतरांच्या लक्ष्यात येतात घराशेजारील तसेच गावातील लोक घटनास्थळी एकत्रित येऊन घर विझवण्याचा प्रयत्न केला. आग एवढी मोठी होती की घर विजवतांनी खूप अडचणी येत होत्या अशामध्येच नगरपंचायत अर्जुनी मोरगाव येथील अग्निशामक यंत्राला बोलवून घर विझवण्यासाठी मदत करण्यात आली. आग विझवेपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते. यामध्ये यामध्ये रोख रक्कम, दाग दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पंखा कुलर,धान्यसाठा तांदूळ भांडी कपडे खिडक्या दरवाजे झोपण्याचे पलंग, लाकडी खाट, मुलांचे शालेय पुस्तक,अ‍ॅल्युमिनियमचे डब्बे आणि इतर साहित्य पूर्णत: जळाले असून केशोरी येथील मंडळ अधिकारी पुंडलिक कुंभरे आणि ग्राम महसूल अधिकारी देवेंद्र बोरकर यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार अंदाजे ११ लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे माहिती तहसीलदार अर्जुनीर् मोरगाव यांना दिली आहे.

घटनास्थळी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे यांनी संपूर्ण पोलीस बंदोबस्त ठेवत आणखी अनुचित प्रकार घडू नये याकडे लक्ष दिले असून गावातील मोठ्या संख्येने गावकरी धावत येऊन आग विझवण्यासाठी मदत केली. आर्थिक नुकसान झालेल्या अपघातग्रस्त कुटुंबामध्ये एकूण नऊ सदस्य होते त्यामध्ये सदाशिव शिवराम मडावी,८० कौस्तुका सदाशिव मडावी ७०, गोवर्धन सदाशिव मडावी ४५, लता गोवर्धन मडावी ४०, नानेश्वर सदाशिव मडावी ३८, नीलिमा न्यानेश्वर मडावी, ३४, अरविंद गोवर्धन मडावी १४, दर्शन गोवर्धन मडावी १२, हिमांशू न्यानेश्वर मडावी ०९ ) यांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंब हे ज्या वस्त्रांमध्ये सकाळी घालून बाहेर गेले त्या वस्त्राव्यतिरिक्त त्या सदस्याकडे एकही वस्त्र नाही तर अन्नसाठा सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. याकडे शासनाने अति जलद पद्धतीने लक्ष देऊन तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे .

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *