महापुरुषांची बदनामी करणाºयावर कठोर कारवाई करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि अपमानजनक मजकूर प्रसिद्ध करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया ह्यगौरेश बावनकरह्ण तसेच ईतर समाजकंटकावर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगर बौद्ध समाज, नवेगावबांधच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी (अर्जुनी/मोर) यांच्यामार्फत निषेध निवेदन सादर करण्यात आले.

सादर निवेदनानुसार, ह्यगौरेश बावनकरह्ण नामक व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्यदिनेश ब्राम्हणकरह्ण या नावाने फेक आयडी तयार करून महापुरुषांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि समाजात द्वेष पसरेल अशा आशयाची पोस्ट प्रसारित केली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण समाजबांधवांच्या भावना दुखावल्या असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या विरोधात तत्काळ गुन्हा नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या आक्षेपार्ह पोस्टची सखोल चौकशी करण्यात यावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. या मागण्यांचा समावेश आहे. महापुरुष हे संपूर्ण समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे हीन विधान करणे हा केवळ एका समाजाचा अपमान नसून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रवृत्तींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शुभम सांगोळकर, रोशन टेंभुर्णे, आशिष शहारे, प्रज्वल शहारे, अजय बडोले, लक्की शहारे, निषेध शहारे आणि बिंबिसार शहारे आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *