वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील वडेगाव बंध्या येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका वृद्ध महिलेवर वाघाने झडप घालून ठार केल्याची दुदैर्वी घटना रविवारी १० मे रोजी सकाळी उघडकीस आली. सलग दुसºया दिवशी झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे. मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे (६५) रा. वडेगाव बंध्या असे आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र गोठणगाव अंतर्गत वनक्षेत्र केशोरी येथील नियतक्षेत्र वडेगाव बंध्या, कक्ष क्रमांक २८२ मध्ये त्या आपल्या सुनेसह तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, बोंडगाव-सुरबन परिसरात काल, शनिवारी ९ मे रोजी तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. त्यात आज पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात भयाचे सावट पसरले आहे. परिसरात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून, वन्यप्राणी गावालगत येऊन कोंबड्या, शेळ्या तसेच लहान मुलांवरही हल्ल्याच्या घटना घडत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *