वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील कुटूंबीयांचे आ. बडोलेंनी केले सांत्वन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत वाघ, बिबट व अस्वलांच्या हल्ल््यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची माहिती मिळताच आ. राजकुमार बडोले यांनी १५ मे रोजी संबंधित गावांना भेट देत जखमींची आस्थेने विचारपूस केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबांना धीर देत शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच वन विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

तालुक्यातील बोंडगाव-सुरबन परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या सुनिता चंद्रकुमार हटवार यांच्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. तर दीपक रतिराम गावळे हे तेंदूपत्ता संकलनासाठी तिरखुरी सहवन क्षेत्रात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. दोघांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. यापैकी सुनिता हटवार यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, आ. बडोले यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस करून आर्थिक मदत केली. तसेच डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तर दिपक गावळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली.

यानंतर वडेगाव-बंध्या येथील कौशल्या राहटे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आ. बडोले यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तर केशोरी येथील कुणाल जागेश्वर मेश्राम या युवकाचा सातारा जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचीही आ. बडोले यांनी भेट घेऊन सांत्वनकेले. केशोरीच्या पंढरीनगरमध्ये सदाशिव मडावी यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच आर्थिक मदतही करण्यात आली. याशिवाय, केशोरी येथील लता रामटेके यांचे २१ एप्रिल रोजी आजाराने निधन झाल्याने त्यांच्या दोन मुली अनाथ झाल्या आहेत. आ. बडोले यांनी त्यांच्या घरी भेट देऊन शासनाकडून मिळणाºया योजनांचा लाभ मिळवून देण्याचे व भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार, जि. प. सदस्य यशवंत गणवीर, जयंत लांजेवार, डॉ. राहुल ठवरे, भोजराम लोगडे, तानेश ताराम, योगेश नाकाडे, राजहंस ढोक, नितीन नाकाडे, नंदकुमार गाहाणे, होमराज पुस्तोळे, विलास बोरकर, संजय खरवडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *