कराटे असो.भंडारा तर्फे आयोजित समर कॅम्प २०२६ उत्साहात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शोतोकान कराटे इंटरनॅशनल आॅफ इंडिया व कराटे असोसिएशन आॅफ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समर कॅम्प २०२६ हा उपक्रम दिनांक १५ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कॅम्पमध्ये मुला-मुलींनी कराटेचे विविध तंत्र, काता, सेल्फ डिफेन्स, फिटनेस आणि शिस्त यांचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, शारीरिक तंदुरुस्ती आणि देशभक्तीची भावना विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आला. कॅम्पच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक सेन्साई विकास बागडे (3१ िऊंल्ल इ’ंू‘ इी’३) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कराटे असोसिएशन आॅफ भंडाराचे अध्यक्ष सूर्यकांत इलमे व ठकर उङ्मंूँ तसेच महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे कोच राकेश सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे यशस्वीआयोजन करण्यात आले. मुख्य प्रशिक्षक सेन्साई विकास बागडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, स्वसंरक्षणाची भावना आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित करणे हा या समर कॅम्पचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, मेहनत आणि सकारात्मक विचार आत्मसात करून भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

कराटे असोसिएशन आॅफ भंडाराचे अध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि क्रीडा संस्कार निर्माण व्हावेत हा कॅम्प आयोजित करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील मुला-मुलींना दजेर्दार कराटे प्रशिक्षण मिळावे यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनचे कोच राकेश सुखदेवे यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास होतो, असे सांगितले. कराटे व इतर क्रीडा प्रकारांमुळे नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि शिस्त विकसित होते. विद्यार्थ्यांनी खेळासोबत शिक्षणालाही महत्त्व देत नियमित सराव करावा, असा संदेश त्यांनी दिला.समर कॅम्पच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, विद्यार्थी व सर्व सहकाºयांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *